वजन कमी होत नाही? फक्त वॉकिंग पुरेसं का नाही? – रुग्णांसाठी माहिती

Patient Information / रुग्ण माहिती

डॉक्टर, कितीही वॉकिंग करून सुद्धा वजन कमी होईना असे म्हणणारे पेशंट मी पाहतो. पाहूया त्यांचे कुठे चुकतंय…

वजन कमी करण्यासाठी
आहार नियंत्रणची 80%
वॉकिंगची 20% भूमिका असते.


🟣🩺 डॉ. अरविंद कुमठाळे
अस्थीरोग सर्जन,
कुमठाळे स्पेशालिटी हॉस्पिटल,
सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
📞 9595-171-172 🟣


🚶 30 मिनिटे वॉकिंगमध्ये कॅलरी बर्न (अंदाजे)

  • हलकं चालणे (3–4 km/hr) = 50–70 कॅलरी
  • मध्यम वेगात चालणे (5–6 km/hr) = 100–150 कॅलरी
  • जलद चालणे (6–7 km/hr) = 150–180 कॅलरी

🍽 चपाती / भाकरी खाल्ल्याने मिळणारी कॅलरी

  • 1 चपाती = ~75 कॅलरी
  • 1 चपाती (तेल लावलेले) = ~120 कॅलरी
  • 1 ज्वारी भाकरी = ~130 कॅलरी
  • 1 बाजरी भाकरी = ~160 कॅलरी
  • एका कप (150–160 ग्रॅम) शिजवलेल्या पांढऱ्या भातामध्ये सुमारे 200–220 कॅलरीज
  • 1 वाटी शिरा (तूप घातलेले) = ~400 कॅलरी
  • 1 प्लेट पोहे (कांदा बटाटा तेल) = ~300 कॅलरी

📝 सोपं समजावण्यासाठी:

वॉकिंग केल्याने वजन कमी होतो हा गैरसमज बाजूला काढा.
एखादी भाकरी कमी खाल्ल्याने कितीतरी जास्त फायदा होतो, हे समजून घ्या.


🟣🩺 डॉ. अरविंद कुमठाळे
अस्थीरोग सर्जन,
कुमठाळे स्पेशालिटी हॉस्पिटल,
सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
📞 9595-171-172 🟣