#गुडघे प्रत्यारोपण सर्जरी (Knee Replacement Surgery)
वय वाढल्याबरोबर अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, कारण वयानुसार गुडघ्यांची वापरून झीज होते, सुरुवातीला फक्त चालताना दुखणे जाणवते, पण हळूहळू जिने चढणे, खुर्चीतून उठणे, बाजारात फिरणे, अगदी घरातील साधी कामे करणेही कठीण होऊन बसते.
अनेक ज्येष्ठ नागरिक “हे तर वयामुळेच आहे” असे समजून वर्षानुवर्षे वेदना सहन करत राहतात आणि जुजबी औषधोपचार आणि फिजिओथेरपी करत दिवस पुढे ढकलत राहतात, लक्षात घ्या गुडघ्यावरील झिजलेला पदर नवीन होत नसतो. गुडघेदुखी मुळे त्यांची हालचाल कमी होते, त्यांना घरातच मर्यादित राहावे लागते, आणि हळूहळू ते कुटुंबावर अधिक अवलंबून होतात. यामुळे त्यांच्या जीवनमानावर परिणाम होतो आणि पुढील पिढीवरही जबाबदारीचे ओझे वाढते.
आज आधुनिक गुडघे प्रत्यारोपण (Knee Replacement) शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्ण पुन्हा वेदनामुक्त आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगत आहेत.
गुडघे प्रत्यारोपण सर्जरी (Knee Replacement Surgery) यामध्ये वयस्कर रुग्णांचे खराब झालेले सांधे कृत्रिम साध्यांनी बदलल्यामुळे तीव्र वेदना कमी होतात, चालणे सोपे होते आणि रुग्ण आपले पूर्वीचे स्वतंत्र व सक्रिय जीवन पुन्हा जगू शकतात
१. तीव्र वेदनेपासून आराम (Pain Relief)
गुडघ्याची हाडे एकमेकांना घासल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात थांबतात, बऱ्याच रुग्णांना चालताना जाणवणारी सततची जळजळ आणि वेदना नाहीशी झाल्यामुळे मानसिक शांतता मिळते
२. सुधारित गतिशीलता आणि स्वातंत्र्य (Improved Mobility & Independence)
सुरुवातीच्या दुखण्यामुळे वृद्ध व्यक्ती बऱ्याचदा अंथरुणाला किंवा एकाच जागेवर खिळून राहतात. शस्त्रक्रियेमुळे पायऱ्या चढणे, चालणे, किंवा दैनंदिन कामे करणे सोपे होते, यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहते.
३. पडण्याचा धोका कमी होतो (Reduced Risk of Falls)
कमकुवत गुडघ्यामुळे वृद्धांचा तोल जाण्याची आणि पडण्याची शक्यता वाढते. प्रत्यारोपणानंतर पायांचे संतुलन सुधारते, ज्यामुळे हाडे मोडण्याचा (फ्रॅक्चर) धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
४. आनंदी आणि सक्रिय जीवनशैली (Better Mental & Social Well-being)
चालता फिरता आल्यामुळे रुग्ण पुन्हा एकदा बागेत फिरणे, प्रवास करणे किंवा आपल्या आवडीच्या छंद जोपासणे सुरू करू शकतात. समाजात मिसळल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो आणि एकाकीपणा दूर होतो.
५. दीर्घकालीन परिणाम (Long-Term Results)
आधुनिक तंत्रज्ञान आणि टायटॅनियम व सिरॅमिक्ससारख्या उत्कृष्ट साहित्यामुळे बसवलेले कृत्रिम सांधे तब्बल १५ ते २० वर्षे टिकतात. अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या ७० किंवा ८० व्या वर्षीही या शस्त्रक्रियेनंतर अत्यंत निरोगी आणि वेदनाविरहित आयुष्य जगतात.
प्रत्येक रुग्णाची प्रकृती, वय आणि आजाराची तीव्रता वेगळी असते. त्यामुळे गुडघे प्रत्यारोपणाची गरज आहे की नाही, याचा निर्णय तज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञांच्या तपासणीनंतरच घ्यावा
वेदना सहन करत आयुष्य घालवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य उपचार घेऊन पुन्हा सक्रिय, आनंदी आणि स्वावलंबी जीवन जगणे शक्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
![]()
डॉ. अरविंद कुमठाळे
अस्थीरोग सर्जन, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ (Joint Replacement Surgeon)
कुमठाळे स्पेशालिटी हॉस्पिटल,
सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
9595-171-172![]()