गुडघ्यात सूज किंवा “पाणी” साचल्यास काय करावे?

गुडघा अचानक सुजणे किंवा गुडघ्यात “पाणी साचले आहे” असे जाणवणे ही सामान्य समस्या असली तरी त्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे.

💧 गुडघ्यात पाणी का साचते?

गुडघ्याची झीज (Osteoarthritis), दुखापत, Meniscus किंवा Ligament ची इजा, Gout, संधिवात किंवा कधी कधी सांध्यातील इन्फेक्शन यामुळे गुडघ्यातील द्रव वाढू शकतो.

⚠️ फक्त पाणी काढणे म्हणजे उपचार नाही!

पाणी काढल्याने काही काळ सूज आणि वेदना कमी होऊ शकतात; परंतु पाणी का साचले आहे हे शोधून त्यावर उपचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

🏠 सुरुवातीला काय काळजी घ्यावी?

गुडघ्यावर जास्त भार देणे आणि अनावश्यक चालणे टाळा.
सूज असल्यास काही काळ थंड शेक उपयोगी ठरू शकतो.
स्वतःहून painkiller किंवा इतर औषधे वारंवार घेऊ नका.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुडघ्यातील पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.

🚨 तातडीने डॉक्टरांना कधी भेटावे?

गुडघा खूप लाल किंवा गरम होणे, अचानक मोठी सूज येणे, तीव्र वेदना किंवा ताप येणे अशी लक्षणे असल्यास त्वरित तपासणी आवश्यक आहे.

🩺 लक्षात ठेवा

“गुडघ्यात पाणी साचणे हा आजार नसून, अनेकदा गुडघ्यातील एखाद्या समस्येचे लक्षण असते.”

👉 वारंवार गुडघ्यात सूज येत असल्यास अस्थिरोग तज्ज्ञांकडून योग्य तपासणी करून मूळ कारणावर उपचार करा.

_______

📍 अधिक माहितीसाठी संपर्क करा.

🟣🩺 डॉ. अरविंद कुमठाळे

अस्थीरोग सर्जन, सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ (Joint Replacement Surgeon)

🏥 कुमठाळे स्पेशालिटी हॉस्पिटल
सैफुल, विजापूर रोड, सोलापूर
📞 9595-171-172

🌟आमच्या रुग्णालयात सर्वच विमा कंपन्यांची कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध आहे.